केंद्र सरकार सार्वजनिक क्षेत्रातील २१ सरकारी बँकांच्या विलीनीकरणाबाबत सक्रिय झाले असून या बँकाचे विलीनीकरण करून ही संख्या १० ते १२ बँकावर आणण्याचा निर्णय घेतला गेला आहे. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये पाच उपबँका व महिला बँकेचे विलीनीकरण अत्यंत यशस्वी ठरले व स्टेट बँक जगातील पहिल्या ५० बॅकांत सामील झाल्यानंतर अन्य बँकांच्या विलीनीकरणाला गती मिळाल्याचे सांगितले जात आहे.
सार्वजनिक क्षेत्रातील सरकारी बँका विलीनीकरणावर सरकार सक्रीय
अर्थ मंत्रालयातील कांही अधिकार्ययांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या कांही वर्षात त्रिस्तरीय रचना करून स्टेट बँकेच्या आकाराच्या ३ ते ४ बँका बनविण्याचा प्रयत्न सुरू आहे या बँका जागतिक बँकांच्या आकाराच्या असतील. पंजाब, आंध्र यासारख्या कांही विशेष क्षेत्रातील विशेष बँका राहतील मात्र अन्य बँकांचे विलीनीकरण केले जाईल. असे संकेत अर्थमंत्री अरूण जेटली यांनी यापूर्वीच दिले आहेत. यामुळे बँकातून अडकलेले कर्ज नियंत्रणात आणणे शक्य होणार आहे. पंजाब नॅशनल, बँक ऑफ बडोदा, कॅनरा, बँकऑफ इंडिया या बॅकांना त्याना कोणत्या बँकांचे विलीनीकरण करून घेणे शक्य आहे याचा तपास करण्याचे आदेश दिले गेले आहेत.