इंडियनची स्काऊट बाँबर बाईक सप्टेंबरमध्ये येणार


रॉयल एनफिल्डपेक्षा मजबूत बाईक बनवून अमेरिकन कंपनी इंडियन मोटरसायकल्सने त्यांच्या परिवारात स्काऊट बाँबर बाईकचा समावेश केला आहे. ही बाईक यूएसमध्ये सप्टेंबरमध्ये लाँच केली जात असून भारतातही त्याच सुमारास लाँच होईल असे समजते. अॅग्रेसिव्ह, स्पोर्टी लूक, चॉप्ड फेंडर्स, मस्त लेदर फिनिश असलेल्या या दणकट बाईकची किंमत साधारण १३ लाखांपर्यंत असेल

या बाईकच्या रायडिंग पोझिशनमध्ये तसेच सस्पेन्शनमध्यें नवे प्रयोग केले गेले आहेत. ११३१ सीसीची ही बाईक व्ही ट्वीन इंजिन व सिक्स स्पीड गिअरबॉक्ससह आहे. पाच कलर्समध्ये ती उपलब्ध केली जात आहे. बॉन्झ स्मोक, इंडियन मोटरसायकल रेड, स्टार सिल्व्हर स्मोक, थंडर ब्लॅक, व थंडर ब्लॅक स्मोक अशा रंगात ती मिळेल.