जगातला सर्वात चिमुकला फोन एलारी नॅनोफोन सी


ई कॉमर्स साईट येरहा डॉट कॉमवर भारतात एलारी नॅनोफोन सी हा जगातील सर्वात छोटा फोन लाँच केला गेला असून यापेक्षा छोटा फोन जगात नाहीच असा दावा कंपनीने केला आहे. स्मार्टफोनच्या दुनियेत हा फोन फारच बेसिक स्पेसिफिकेशनसह आणला गेला असून त्याची किंमत आहे ३९४० रूपये व आकार आहे क्रेडीट कार्ड एवढा.

हा फोन जीएमएस फोन आहे व तो सिल्व्हर रोज, गोल्ड व ब्लॅक अशा तीन रंगात उपलब्ध आहे. स्टाईलिश, अँटीकार्ट व अल्ट्रा कॉम्पॅक्ट अशी त्याची कंपनीने जाहिरात केली आहे. फोनचे वजन ३० ग्रॅम असून त्याला १ इंचाचा टीएफटी स्क्रिन दिला गेला आहे. त्याला आरटी ओएस, ३२ एमबी रॅम,३२ एमबी मेमरी ती कार्डच्या सहाय्याने ३२ जीबी पर्यंत वाढविण्याची सुविधा, ड्यूल सिम, ४ तास टॉकटाईम व चार तास स्टँडबाय देणारी बॅटरी, एमपी थ्री, व्हॉईस रेकॉर्ड, मायक्रो यूएसबी पोर्ट, अॅडिओ जॅक, मॅजिक व्हॉईस फंक्शन दिले गेले आहे. हे फिचर ब्ल्यू टूथवर काम करते व अँड्रईड, आयओएसला जोडता येते. यामुळे युजर फोनवर आलेल्या कॉलला कनेक्टेड स्मार्टफोनवरून उत्तर देऊ शकतो.

Leave a Comment