इन्फोसिसने तयार केली चालकरहित कार्ट कार


भारतातील दिग्गज आयटी कंपनी इन्फोसिसने नव्या क्षेत्रातील आपले कौशल्य सिद्ध करताना देशातील पहिली चालकरहित कार तयार केली आहे. कंपनीचे सीईओ विशाल सिक्का यांनी या कारमधून कार्यालय गाठले आणि कारची पहिली झलक सोशल मिडीयावर पेश केली. इन्फोसिसमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स, रोबोटिक्स व चालकरहित कार विकसित करण्याचे काम गेल्या कांही दिवसांपासून सुरू आहे. गेली अनेक वर्षे कंपनीचा विकास मंद गतीने होत असल्याने या नव्या क्षेत्रात प्रवेश करण्याचा निर्णय कंपनीने घेतला असल्याचे सांगितले जात आहे.

चालकरहित गोल्फ कार्टप्रमाणे दिसणारी ही पहिली कार इंजिनिअरींग विभागातील तंत्रज्ञांनी मैसूर येथेच तयार केली आहे. सीईओ सिक्का म्हणाले जगभरात चालकरहित कार क्षेत्राचा प्रचंड विकास होईल असे अंदाज वर्तविले जात आहेत. आम्ही अशी पहिली कार बनवून या तंत्रज्ञानातही आम्ही पुढे आहेात हे सिद्ध केले आहे. स्वदेशी चालकरहित कार क्षेत्रात अधिक सक्रीय होण्याचा व त्यासंबंधित प्रोजेक्टसाठी हजारो इंजिनिअर्सचा पूल बनविण्याचा मनोदयही यावेळी त्यांनी व्यक्त केला.

Leave a Comment