व्होडाफोनची खास महिलांसाठी सखी योजना


वोडाफोन इंडियाने विशेषतः ग्रामीण भागातील महिला सबलीकरणास मदत ठरणारी सखी योजना आणली आहे. यात महिला त्यांचा फोन नंबर रिटेलरला न देता रिजार्च करू शकणार आहेत. ही सेवा सध्या पश्चिम उत्तरप्रदेश व उत्तराखंडच्या ग्रामीण भागात सुरू केली गेलीआहे. महिला सुरक्षा लक्षात घेऊन त्यातही ग्रामीण महिलांचे सबलीकरण करणे याचबरोबर ग्रामीण भागातील महिलांना डिजिटल क्रांतीत सर्वात पुढे ठेवणे हा यामागचा उद्देश आहे. कंपनीने या सेवेमुळे ग्रामीण महिला सबल होतील व त्याचबरोबर आपल्या जिवलगांच्या संपर्कातही राहतील अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

एका अहवालानुसार जगात मोबाईल फोन धारकांत पुरूषांच्या तुलनेत महिलांचे प्रमाण ३० कोटींनी कमी आहे. व्होडाफोन प्रायव्हेट रिचार्ज मोड ही सेवा मोफत आहे. त्यात महिलांना आपला मोबाईल नंबर न देता रिटेलर्सकडूनही फोन रिचार्ज करता येईल व त्यासाठी १२६४० हा टोलफ्री नंबर दिला गेला आहे. त्यावर प्रायव्हेट असा मेसेज करून फोन करायचा आहे. त्यानंतर युजरला ओटीपी कोड मिळेल. तो वापरून २४ तासात त्यांनी फोन रिचार्ज करायचा आहे. यात ५२ रूपयांत ४२ रूपयांचा टॉकटाईम, ७८ रूपयांत ६२ रूपयांचा टॉकटाईम तर ९९ रूपयांत ७९ रूपयांचा टॉकटाईम मिळणार आहे. या शिवाय या तिन्ही प्रकारात ५० एमबीचा टूजी व थ्रीजी डेटाही वापरता येणार आहे.

Leave a Comment