भारतात लॉन्च झाली स्कोडाची नवीन ऑक्टाविया


नवी दिल्ली: आपली नवीन फेसलिफ्ट सेडान कार ऑक्टाविया प्रसिद्ध कार कंपनी स्कोडाने भारतात लॉन्च केली आहे. १५.४९ लाख रूपयांपासून ते २२.८९ लाख रूपयांदरम्यान भारतात या कारची एक्स शो रूम किंमत असणार आहे. नवी फेसलिफ्ट ऑक्टाविया दोन पेट्रोल आणि एक डिझल इंजिन पर्यायांमध्ये उपलब्ध होईल.

स्कोडाने एक नवीन रिफ्रेशिंग लूक ऑक्टावियाला दिला असून याच्या फ्रन्टला हेडलॅम्प, फॉग लॅम्प, नवीन बंपर आणि ग्रिल दिले आहेत. कारला स्पोर्टी लूक देण्यासाठी यात १६ इंचाचे अलॉय व्हिल देण्यात आले आहेत. या कारच्या डिझाईनमध्येही मोठे बदल करण्यात आले आहेत. या कारमध्ये इन्फोटेन्मेंट सिस्टम देण्यात आले आहे. त्यासोबतच ८.० इंचाचे टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टीम देण्यात आले आहे. हे सिस्टम अ‍ॅपल कारप्ले, अ‍ॅन्ड्रॉईड ऑटो आणि मिररलिंक कनेक्टिव्हीटीला सपोर्ट करते. या कारमध्ये कंपनीने ऑटोमॅटिक पार्किंग मोड सेवा दिली आहे.

Leave a Comment