आता कोणतीही फाइल व्हॉट्सअॅपवरून पाठवणे शक्य


मुंबई : एक नवीन फिचर इन्स्टेंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपमध्ये जोडण्यात आले असून तुम्ही आता या अपडेटनंतर कोणत्याही फाइल्स पाठवू शकता.

व्हॉट्सअॅपने यापूर्वी पीडीएफ फाइल पाठविण्याचे फिचर दिले होते. त्यात १००एमबीची फाइल पाठवता येते. सुरूवातीला व्हॉट्सअॅपवर कोणत्याही प्रकारची फाईल पाठविण्याचे फिचर नव्हते. पण हळूहळू कंपनीने फोटो, ऑडिओ आणि व्हिडिओसह पीडीएफ फाइल्स शेअरिंगला सुरूवात केली.

पीडीएफनंतर सीएव्ही, डॉक, पीपीटी, पीपीटीक्स, आरटीएफ, टीएक्सटी आणि एसएलएस सारख्या फाइल पाठविण्याचे ऑप्शन आल्यामुळे आता सर्व फाइल फॉरमॅट व्हॉट्सअॅपद्वारे पाठविता येणार आहेत. रिपोर्ट्स नुसार आयओएस यूजर्सनां १२८एमबी पर्यंत फाइल सेंड करता येणार आहे. तर अँड्रॉइड युजर्स १००एमबीची लिमीट आहे. तर व्हॉट्सअॅप वेबसाठी केवळ ६४एमबी पर्यंत फाइल्स पाठवता येणार आहे.

तुम्ही नव्या अपडेटने व्हॉट्सअॅपद्वारे कोणालाही कोणतेही अॅपसुद्धा पाठवू शकतात. तसेच या अपडेटमध्ये दुसरा फिचर जोडण्यात आला आहे. त्यात कॅमरा स्क्रिनवरून फोटो आणि व्हिडिओ सेलेक्ट करू शकतात. नुकतेच व्हॉट्सअॅपने फोटो फिल्टर ऑप्शन दिला आहे. त्यात तुम्ही फोटो पाठवताना फिल्टर्स लावू शकतात.

Leave a Comment