भारतात दाखल झाली ६० लाखांची डुकाटी


नवी दिल्ली : आपल्या धडाकेबाज बाईक १२९९ पैनिगल आरची शेवटची एडीशन डुकाटीने जगभरानंतर आता भारतातही लॉंच केली आहे. अमेरिकेच्या कॅलिफॉर्नियामध्ये वर्ल्ड सुपरबाईक चॅम्पिअन्सशिपमध्ये ही बाईक प्रदर्शित केली गेली. या बाईकची किंमत ५९.१८ लाख रुपये ऐवढी आहे.

केवळ लास्ट टाईमच एल-ट्विन इंजिन १२९९ पॅनिगल आर फायनल एडिशनमध्ये दिले गेले आहे. त्यानंतर कंपनी वी ४ इंजिनवर आली आहे. सुपरबाईक वर्ल्ड चॅम्पिअन्सशिपमध्ये इतिहास रचणाऱी ही बाईक आहे. ट्विन सिलिंडर इंजिन बेस्ट असल्याचे डुकाटीतर्फे सांगण्यात येत आहे. १२८५ सीसीचे इंजिन २०९ बीएचपीची पॉवर आणि १४२ एनएम का टॉर्क देण्यासाठी ही सक्षम आहे. पावर ६-स्पीड गिअरबॉक्सच्या माध्यमातून रिअर व्हीलपर्यंत जाईल. यामध्ये क्वीकशिफ्टर फीचरदेखील असणार आहे. पावरफुल इंजिन आणि इलेक्ट्रोनिक्स सोबतच याच्या दोन्ही बाजूस ओहलींस सस्पेंशन, बेंब्रो बेक्स, पाइरेली डायब्लो सुपरकोरसा एसपी टायर्स दिले गेले आहेत. यासोबतच कलर टीएफटी डिस्प्ले दिला गेला आहे.

Leave a Comment