ट्रायंफच्या टायगर एक्सप्लोररची फक्त १० युनिट भारतात विक्रीला


पॉवरफुल बाईक बनविणार्‍या ट्रायंफ कंपनीने त्यांची सर्वात महागडी बाईक टायगर एक्सप्लोरर जुलै महिन्यात भारतात लाँच केली जात असल्याची घोषणा केली असून या बाईकची फक्त १० युनिट भारतात विकली जाणार आहेत. कंपनीने या बाईकची किंमत जाहीर केलेले नसली तरी जाणकारांच्या मते ही बाईक साधारण २२ लाखांच्या दरम्यान असेल.

जागतिक बाजारात या मॉडेलची सहा व्हेरिएंट कंपनीने सादर केली आहेत मात्र भारतात एकच व्हेरिएंट सादर केले जाणार आहे. या बाईकसाठी १२१५ सीसी लाईन ट्रीपल इंजिन सहा स्पीड गिअरबॉक्ससह दिले गेले आहे. दूरच्या प्रवासाच्या हिशोबानेच ती तयार केली गेली असून पहाडी रस्त्यांसाठी हायड्रोलिक टॉक असिस्ट क्लच, रेन, रोड व ऑफरोड मोड अँटी ब्रेकिंग सिस्टीमसह दिले गेले आहेत. एबीसी, ट्रॅक्शन कंट्रोल, थ्रोटल मॅप्स अशी हायटेक फिचर्सही या बाईकला दिली गेली आहेत.

Leave a Comment