अदृष्य होऊन उडणारे सुदर्शनचक्र ड्रोन


कानपूरच्या आयआयटी विद्यार्थ्यांनी जगातले पहिले रिमोट कंट्रोल बुमरँग ड्रोन तयार केले असून हे ड्रोन उडताना अदृष्य होते व यामुळे हेरगिरीसाठी ते अतिशय उपयुक्त ठरणार आहे. या ड्रोनचे पंखे इतके जोराने फिरतात की उडताना ते दिसतच नाहीत. यामुळे या ड्रोन चे नांव सुदर्शनचक्र असे ठेवले गेले आहे. हे ड्रोन कोणत्याही क्षेत्राचे ३६० अंशातून फोटो व व्हिडीओ घेऊ शकते. आयआयटी एरोस्पेस इंजिनिअरिंगचे प्रो. अभिषेक कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली रजत त्रिपाठी, रामाकृष्णा व सौरभ सिन्हा या विद्यार्थ्यांनी हे ड्रोन तयार केले असून त्याचे पेटंट घेतले गेले आहे.

या ड्रोन ची चाचणी५० फुट उंचावरून घेतली गेली. या ड्रोन ला २३०० किलोवॅटची मोटर व १-१ फुटाचे पंख आहेत. त्याला ६ इंचाचा प्रोपेलर म्हणजे पुढच्या बाजूचा पंखा आहे. हे ड्रोन कोणत्याही भागात उडविता येते व त्याचा उपयोग पाळत ठेवणे, एखाद्या भागाची भौगोलिक परिस्थिती समजावून घेणे, युद्ध, आत्पकाल काळात करता येणार आहे. हे ड्रोन तयार करण्यासाठी ६ महिने लागले. त्याचे पंख फायबरपासून बनविले गेल्याने ते वजनाला हलके आहेत व मजबूतही आहेत.

Leave a Comment