स्वस्त आणि मस्त मोटो ई ४ प्लस भारतात लाँच


नवी दिल्ली : भारतात मोटो ई4 प्लस लाँच झाला असून ५००० mAh बॅटरीवाल्या या स्मार्टफोनची किंमत ९९९९ रुपये आहे. काल रात्री १२ नंतर हा फोन फ्लीपकार्टवरदेखील उपलब्ध झाला आहे. या फोनसोबत दोन महिन्याचा हॉटस्टार प्रिमियम सब्सक्रिप्शन दिले जाणार आहे. याव्यतिरिक्त वोडाफोन कस्टमर्सना ४४३ रुपयांमध्ये तीन महिन्यांसाठी ८४ जीबी डेटा दिला जाणार आहे. रिलायन्स जिओ प्राईम मेंबर्सना ३० जीबी एक्स्ट्रा डेटा दिला जाणार आहे. ग्राहक ९००० रुपयात एक्स्चेंज आणि ४००० रुपयाच्या बायबॅक गॅरंटी ऑफरचा फायदाही घेऊ शकतात. गेल्या महिन्यात मोटो ई ४ सोबत मोटो ई ४ प्लस ग्लोबली लाँच केला होता. भारतात मोटो ई ४ ८९९९ रुपयात मिळत आहे. यात २८००mAh ची बॅटरी आहे. त्याचसोबत प्लस वर्जनमध्ये दमदार बॅटरी दिली गेली आहे.

मेटल बॉडी डिझाइनचा मोटो ई ४ प्लस च्या होम बटणावर फिंगरप्रिंट स्कॅनर दिला गेला आहे. यामध्ये ५.५ इंच एचडी डिस्प्ले (१०८० *७२० पिक्सल) आहे. फोनमध्ये क्वाड कोर क्वॉलम स्नॅपड्रॅगन ४२७ प्रोसेसरसोबत ३ जीबी रॅम आणि ३२ जीबी इंटरनल स्टोरेज दिले आहे. मोटो ई ४ प्लसमध्ये १३ मेगापिक्सल रिअर आणि ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. मोटो ई ४ प्लस मध्ये वॉटर रेपलेट कोटींग दिली गेली आहे. यामुळे पाण्यापासून स्मार्टफोनचा बचाव होतो. डिवाइस ब्यूटूथ ४.१LE, वायफाय 802.11a/b/g/n आणि ४जीला सपोर्ट करतो.

Leave a Comment