फ्लिपकार्ट ग्राहकांना खरेदीवर देत आहे तब्बल ८०% पर्यंत सूट


मुंबई – जीएसटी लागू झाल्यानंतर अमेझॉनने प्राइम डे सेलचे आयोजन केले होते. अमेझॉनच्या या सेलनंतर आता त्याचा प्रतिस्पर्धी असलेल्या फ्लिपकार्टनेही आपल्या ग्राहकांसाठी मेगा सेलचे आयोजन केले आहे.

ग्राहकांसाठी फ्लिपकार्टने एक जबरदस्त ऑफर उपलब्ध करुन दिली असून या ऑफरमध्ये वस्तूंच्या खरेदीवर तब्बल ८० टक्क्यांपर्यंत सूट देण्यात आली आहे. आपल्या या सेलमध्ये फ्लिपकार्टने विशेष वस्तू म्हणजेच नव-नवीन मोबाईल फोन्स लॉन्च करणार आहे. तसेच, एचडीएफसीच्या क्रेडिट आणि डेबिट कार्डद्वारे वस्तूंची खरेदी केल्यास १० टक्के सूट मिळणार आहे.

तसेच, फ्लिपकार्टच्या यूपीआय आधारित पेमेंट अॅप फोनपे वापरत जे ग्राहक वस्तूंची खरेदी करतील तर त्यांना १५ टक्क्यांपर्यंत कॅशबॅक मिळू शकते. साडी, फुटवेअर, बॅग्ज यांच्यावर ७० टक्क्यांपर्यंत सूट देण्यात आली आहे. तर ज्वेलरी सेटवरही विविध ऑफर्स देण्यात आल्या आहेत. फ्लिपकार्टने महिलांसाठी खास ‘Women’s only Wdnesdays’ सेलचे आयोजन केले आहे. महिलांसाठी या सेलमध्ये ज्वेलरी, हँडबॅग्ज आणि फूटवेअर यांच्यावर मोठ्या प्रमाणात सूट देण्यात आली आहे.