एअरटेलचा दर महिन्यात शिल्लक राहिलेला डेटा पुढील बिलात होणार ट्रान्सफर


नवी दिल्ली: एअरटेलच्या पोस्टपेड ग्राहकांसाठी येणा-या महिन्यात खूपकाही बदलणार आहे. कंपनीच्या पोस्टपेड ग्राहकांना आता प्रत्येक महिन्यात ठरवून देण्यात आलेला डेटा पूर्ण न वापरल्याच्या चिंतेतून सुटका मिळणार आहे. डेटा रोल ओव्हर प्रॉमिस प्लॅनची घोषणा या टेलिकॉम कंपनीने केली आहे. एअरटेलच्या प्रोजेक्ट नेक्स्टचा ही सेवा भाग आहे. कंपनीने याआधीही दोन वर्षांआधी आपल्या वेगवेगळ्या सेवा ग्राहकांना अनुभवता याव्यात म्हणून प्रोजेक्ट लीप प्रोग्रामची घोषणा केली होती.

एअरटेलच्या पोस्टपेड ग्राहकांना १ ऑगस्टपासून बिलींग सायकलमध्ये शिल्लक राहिलेल्या डेटाची चिंता करणे सोडावे लागेल. तुम्ही हा न वापरलेला डेटा आपोआप पुढच्या बिलात ट्रान्सफर होईल. याबाबत कंपनीने सांगितले की, हा एक नवा प्रयोग आहे. ग्राहकांचा न वापरलेला डेटा या सेवेमुळे वाया जाणार नाही. यासारख्या अनेक गोष्टी एअरटेल ग्राहकांसाठी घेऊन येणार आहे.

माय एअरटेल अ‍ॅपच्या मदतीने एअरटेलचे ग्राहक आपल्या डेटावर लक्ष ठेवू शकतील. यासोबतच कंपनीने नव्या फॅमिली प्रॉमिस प्रोग्रामचीही घोषणा केली. याद्वारे पोस्टपेड ग्राहक आपल्य परिवारासाठी वेगवेगळ्या सुविधा घेऊ शकतात. हे माय एअरटेल अ‍ॅपच्या मदतीनेच होणार आहे. नव्या प्रोज्केट नेक्स्ट प्रोग्रामनुसार कंपनी देशभरात २,५०० फिजिकल आणि मोर्टार स्टोरला अधिक चांगलं करणार आहे. एअरटेलने माहिती दिली की, ते लवकरच अ‍ॅप आणि वेबसाईट नव्या अवतारात सादर करतील.

Leave a Comment