स्मॉग शोषणारी व स्वच्छ हवा बाहेर टाकणारी सायकल


पृथ्वी प्रदूषण मुकत करण्यासाठी जगभरातील सर्वच वैज्ञानिक विविध प्रकारचे उपाय योजत असतानाच चीनमधील सायकल शेअरिंग स्टार्ट अप ओफो ने स्मॉग फ्री सायकली बाजारात आणून नवा अध्याय लिहिला आहे. अर्थात यासाठी त्यांना एका डच डिझायनरने सायकलचे डिझाईन करण्यात मदत केली आहे. डान रूजगार्ड असे या डिझायनरचे नांव आहे. कंपनीने त्यांच्याबरोबर सामंजस्य करार केला आहे.

या सायकलमध्ये हवा साफ करू शकणारे एक मॉड्यूल आहे. सायकल चालविताना हे मॉड्यूल आसपासची हवा साफ करण्यास हातभार लावते. ही सायकल स्मॉग शोषते व पॅडल मारण्यातून जी उर्जा निर्माण होते त्याचा उपयोग करून स्वच्छ हवा बाहेर टाकते.ही सायकल असल्याने गर्दीत सहज चालविता येते शिवाय तिच्यामुळे प्रदूषणापासूनच चालकाला सुटका मिळते. या प्रकारची ही पहिलीच सायकल आहे.

Leave a Comment