शाओमीचा मी मॅक्स टू १८ जुलैला भारतात


येत्या १८ जुलैला चीनी मोबाईल कंपनी शाओमीने त्यांचा नवा फोन भारतात लाँच होत असल्याची घोषणा केली आहे. हा फोन मी मॅक्स टू असावा असा जाणकारांचा अंदाज आहे. कंपनीच्या हॅशटॅगवरून हा अंदाज बांधला जात आहे. बिग इज कमिंग अशी ही लाईन असून शाओमीचा मी मॅक्स टू हा मोठ्या स्क्रीनचा फोन असल्याने लाँच होणारा फोन हाच असावा असे सांगितले जात आहे.

या फोनसाठी ६.४४ इंची स्क्रीन दिला गेला आहे व ५३०० एमएएचची किमान दोन दिवस चालू शकणारी बॅटरी हे त्याचे खास वैशिष्ठ आहे. ही बॅटरी किवक चार्ज तंत्रज्ञानासह आहे. यामुळे १ तासात फोनची ६७ टक्के बॅटरी चार्ज होऊ शकते. या फोनला ४ जीबी रॅम दिली गेली आहे. चीनमध्ये हा फोन ६४ व १२८ जीबी इंटरनल मेमरी अशा दोन्ही व्हेरिएंटमध्ये लाँच केला गेला आहे. त्याला एमआयू १८ ही अँड्राईड नगेट वर चालणारी ऑपरेटिंग सिस्टीम दिली गेली आहे. १२ एमपीचा प्रायमरी तर ५ एमपीचा फ्रंट कॅमेरा त्याला दिला गेला आहे.

Leave a Comment