ट्विटरचे नवे फिचर ‘ट्रोल’ होण्यापासून वाचवणार


मुंबई : आपल्या युझर्ससाठी एक नवीन फिचर मायक्रोब्लॉगिंग वेबसाईट ‘ट्विटर’ने लॉन्च केले आहे. हे फिचर ‘ट्रोल’पासून हैराण होणाऱ्या युझर्ससाठी खूप महत्त्वाचे ठरणार आहे.

आपल्या युझर्सच्या सुविधेसाठी ‘ट्विटर’ने Mute Notification चे ऑप्शन समोर आणले आहे. तुम्ही या नव्या फिचरमुळे ज्या अकाऊंटसना फॉलो करत नाही त्या अकाऊंटवरून येणाऱ्या नोटीफिकेशन्स तुम्ही बंद करू शकता. या नव्या फिचरसाठी तुम्हाला Advanced Filter Settings मध्ये जाऊन Mute चा ऑप्शन सिलेक्ट करू शकता. याशिवाय, ज्यांच्याकडे कन्फर्म ईमेल आयडी किंवा फोन नंबर नाही किंवा तुम्ही ज्यांना फॉलो करत नाही, अशा अकाऊंटसच्या नोटिफिकेशन्सला बंद करण्याची सुविधा या फिचरमुळे तुम्हाला मिळणार आहे. या फिचरचा वापर iOS युझर्सही करू शकतात.

Leave a Comment