८वी पास तरूणांनो पोस्टामध्ये वाट पाहात आहे नोकरी


मुंबई: तुम्ही जर तुटपूंज्या शिक्षणाअभावी सरकारी नोकरीपासून वंचीत राहिला असाल तर पोस्टामध्ये नोकरी तुमची वाट पाहात आहे. तुमच्यासाठी महाराष्ट्र पोस्टात संधी असून, त्यासाठी आठवी पास ऐवढे नाममात्र शिक्षण असणे आवश्यक आहे. महाराष्ट्र पोस्टल सर्कलमध्ये कुशल कारागीर पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. प्राप्त माहितीनुसार ६ जागांसाठी हे अर्ज मागविण्यात येत आहेत.

कुशल कारागीर पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवाराचे वय १८ वर्षे पूर्ण तसेच, ३० वर्षे आणि त्यापेक्षा कमी असणे आवष्यक आहे. यासोबतच उमेदवार हा कोणत्याही मान्यताप्राप्त शैक्षणीक संस्थेतून ८ उत्तीर्ण झालेला असणे आवश्यक आहे. २८ ऑगस्ट २०१७ पर्यंत कुशल कारागीर पदासाठी उमेदवार अर्ज करू शकतात.

www.indiapost.gov.in या संकेतस्थळाला नोकरीसाठी इच्छुक उमेदवार भेट देऊन आपला अर्ज दाखल करू शकतात. उमेदवाराला अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांच्या सेल्फ अटेस्टेड फोटोकॉपी जोडाव्या लागणार आहेत. तसेच, अर्जासोबत जोडलेली सर्व कागदपत्रे Sr. Manager, Department Of Posts, Mail Motor Service, 134/A, S.K.Ahire Marg, Worli, Mumbai 400018 या पत्त्यावर पाठवून आपली अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण करायची आहे.

Leave a Comment