स्टार्टअपमध्ये गुंतवणूक करणार गांगुली


मुंबई – मुंबईस्थित फ्लिकस्ट्री या मोफत व्हिडिओ आधारित कंपनीमध्ये माजी क्रिकेटपटू सौरभ गांगुली गुंतवणूक करणार आहे. वापरकर्त्यांच्या आवडीप्रमाणे फ्लिकस्ट्रीमध्ये व्हिडिओ पुरविले जातात. कॉमेडी, माहितीपट, नाटक याव्यतिरिक्त २० पेक्षा अधिक प्रकारांची निवड यामध्ये करता येते.

कोलकात्याच्या आदित्य ग्रुप, व्हेन्चर्स कॅटालिस्ट आणि मोक्ष स्पोर्ट्स व्हेन्चर्स या कंपन्यांनी फ्लिकस्ट्रीमध्ये साधारण ३ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. २०१४ मध्ये स्थापन झाल्यानंतर ऑगस्ट २०१६मध्ये ही फ्लिकस्ट्री अधिकृत सेवा सुरू करण्यात आली. कंपनीचे संस्थापक सौरभ सिंग, राहुल जैन आणि नागेंदर सांगरा यांनी जानेवारी २०१७मध्ये व्हिडिओ मॅगझिन सुरू केले. सध्या फ्लिकस्ट्रीजे ७५ हजार वापरकर्ते आहेत. २०१८ पर्यंत १० लाख ग्राहकापर्यंत पोहोचण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे. २०१९च्या सुरुवातीला ऑस्ट्रेलिया आणि इंडोनेशियामध्ये विस्तार करण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे.

Leave a Comment