तुमच्याकडे जर असेल आधार आणि यूएएन तर तुम्ही काढू शकता ऑनलाईन पीएफ


नवी दिल्ली: अनेकांना कित्येक दिवस पीएफ काढण्यासाठी ऑफिसला फे-या माराव्या लागतात. पण तुम्हाला आता पीएफचे पैसे काढण्यासाठी कुठे फे-या मारण्याची गरज नाही. कारण आता तुम्ही तुमचे पीएफचे पैसे ऑनलाईन काढू शकता. पीएफ काढण्यासाठी आणि अ‍ॅडव्हांस घेण्यासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी विभागाने ऑनलाईन क्लेम फाइल सुविधा सुरू केली आहे. पीएफच्या साधारण ४ कोटी खातेदारांना याचा फायदा होणार आहे. पण यासाठी तुमच्याकडे आधार आणि यूएएन(यूनिव्हर्सल अकांऊट नंबर) असणे गरजेचे आहे.

आता ईपीएफओ खातेदार पीएफ ऑनलाईन काढू शकतात, अशी सेवा सुरू करण्यात येईल असे सांगण्यात आले होते. ती सेवा त्यानुसार सुरू करण्यात आली आहे. ही सेवा यूनीफाईड पोर्टलवर सुरू करण्यात आली आहे. सध्या ईपीएफओचे ४ कोटी अ‍ॅक्टीव्ह खातेदार आहेत. त्यांना या सेवेचा फायदा मिळणार आहे. ईपीएफओच्या एकूण खातेदारांची संख्या १५ कोटी आहे.

तेच लोक ऑनलाईन क्लेम सबमिट करण्याच्या सेवेचा फायदा घेऊ शकतात, जे यूनीफाईड पोर्टलवर केवायसी पूर्ण करतील. म्हणजे तुम्हाला अ‍ॅक्टीवेटेड यूएएन, आधार आणि बॅंक अकाऊंट नंबर द्यावा लागेल. त्यानंतर यूनीफाईड पोर्टलवर ऑनलाईन क्लेम सबमिट केले जाऊ शकते. ईपीएफओने आधार सीडिंगला इनकरेज करण्यासाठी त्यांनी आपल्या फिल्ड ऑफिसर्सना आदेश दिले आहे की, त्यांनी ऑनलाईन क्लेमला प्राओरिटी द्यावी आणि अशा क्लेमची सेटलमेंट 5 दिवसात करावी.

पीएफ काढण्यासाठी – ऑनलाईन क्लेम सबमिट करण्यासाठी तुम्हाला ईपीएफओची वेबसाईट http://www.epfindia.com/site_en/ ला भेट द्यावी लागेल. येथे तुम्हाला ऑनलाईन क्लेम ऑप्शन दिसेल. ऑनलाईन क्लेम ऑप्शनवर क्लिक केल्यावर https://unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface/ ही लिंक ओपन होईल. येथे खातेदाराला त्यांच्या यूनीव्हर्सल अकाऊंट नंबर म्हणजेच यूएएन आणि पासवर्ड टाकावा लागेल. त्यानंतर क्लेम सबमिट करण्याचे ऑप्शन मिळेल.

Leave a Comment