ज्या न्यायालयासमोर मागितली भीक त्याच न्यायालयात तृतीयपंथी झाली न्यायाधीश


आम्ही तुम्हाला आज सांगणार आहोत एका न्यायाधीशाची कहानी. साध्यासुध्या न्यायाधीशाची ही कहानी नाही. तर, एका तृतीयपंथी भिकाऱ्याचा न्यायाधीश पदापर्यंतचा संघर्षमय प्रवास हा आहे. कारण, जेव्हा एखादा तृतीयपंथी ‘जजशिप ऑन ड्यूटी’ अशी लाल अक्षरांत लिहीलेली पाटी झळकणाऱ्या कारमधून सुरक्षारक्षकांच्या गराड्यात उतरतो, तेव्हा हा क्षण केवळ तृतीयपंथीच नव्हे तर, संपूर्ण भारतीयांसाठी सुद्धा कौतूकाचा क्षण असतो.

आपण ज्या तृतीयपंथी न्यायाधिशाबद्धल बोलतो आहोत तीचे नाव जोईता मंडल आहे. जोईतासाठी भिकारी ते न्यायालयातील न्यायाधीश हा प्रवास मुळीच सोपा नव्हता. केवळ विचारांच्या परिवर्तनामुळे आणि मनात असलेल्या जिद्दीमुळेच जीवन जगण्यासाठी भीक मागने, भिक मागता मागता सामाजिक काम करणे आणि त्याचसोबत आपले शिक्षण सुरू ठेवणे, हे सगळे जोईताने केले आहे. जोईताच्या आयुष्यात ०८ जुलै हा दिवस मोठा बदल घडवून गेला. इस्लामपुरच्या सब-डिवजनल लीगल सर्विस कमिटीने या दिवशी जोईताला न्यायाधीश म्हणून नियुक्त केले. जोईताचे हे नवे कार्यालय त्या बसस्टॅंड आणि ठिकाणापासून केवळ १० मिनीटांच्याच अंतरावर आहे कधीकाळी ती त्या ठिकाणी झोपायची आणि भिकही मागायची. कारण इतकेच की, तृतीयपंथी असल्यामुळे अनेक हॉटेल्सनी तिला रूम द्यायला नकार दिला होता. हीच घटना जोईताच्या मनाला चटका लाऊन गेली. तिने जे आपल्या वाट्याला आले ते इतर तृतीयपंथीच्या वाट्याल येऊ द्यायचे नाही, यासाठी प्रयत्न करायचे ठरवले. त्यासाठी तिने गोदर स्वत: यशस्वी बनायचे ठरवले.

जोईताने इंग्रजी वृत्तपत्र टाईम्स ऑफ इंडियाला दिलेली प्रतिक्रिया खूप बोलकी आहे. जोईता आपल्या प्रतिक्रियेत म्हणते मला माझ्या यशाबद्धल अभिमान आहे. तसेच, न्यायाधीश म्हणून माझी झालेली निवड ही लिंगभेद करणाऱ्या समाजाला मिळालेली चपराक आणि संदेशही आहे. जोईताला ८ जुलै रोजी इस्लामपूरच्या सब-डिवविजनल लीगल सर्विस कमिटीने लोकअदालत न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्त केल्याचे पत्र मिळाले. या पत्रात तिचा उल्लेख सामाजिक कार्यकर्ती असा होता. जोईता सध्या ‘लर्न्ड जज’ कॅटेगिरीत येते. कायदेशीर बाजूचा विचार करता सब डिविजनल कमिटीच्या अध्यक्षांकडून कमिटीचा हा निर्णय कोलकातास्थित स्टेट लिगल सर्विस ऑथेरीटीकडे पाठविण्यात आला आहे.

तृतीयपंथीयांशी संबंधीत अनेक प्रश्नांवर जोईता आपल्या सामाजिक कार्यासोबतच २०११पासून काम करत आहे. ती लोकन्यायालयात बॅंकलोनसंबंधी आलेला खटला पाहात होती. पण, जेव्हा ती एका ऑफिशीअली कारमधून सुरक्षारक्षकांच्या गराड्यात कोर्टरूमपर्यंत पोहोचली तेव्हा लोकांच्या आश्चर्याला पारावारच राहिला नाही.

Loading RSS Feed

Leave a Comment