सारत – समुद्रात हरविलेल्या वस्तू शोधणारे अॅप


भारतीय राष्ट्रीय महासागर सूचना व सेवा केंद्र हैद्राबाद ने सारत नावाचे एक अॅप विकसित केले असून ते ६४ प्रकारे समुद्रात हरविलेल्या वस्तूंचा ठावठिकाणा शोधण्यासाठी उपयुक्त ठरू शकणार आहे. यात नावा, जहाजे, विमाने, जहाजांवरील नागरिक यांचा शोध घेता येतो. राष्ट्रीय समुद्री शोध व बचाव विभागाचे अध्यक्ष व भारतीय तटरक्षक विभागाचे महासंचालक राजेंद्रसिंह यांनी सोमवारी हे अॅप दिल्लीत लाँच केले. गुगल प्ले स्टोअरवरून ते डाऊनलेाड करून घेता येणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार याच प्रणालीचे वेबव्हर्जन गतवर्षी भारतीय तटरक्षक दल, भारतीय नौसेना व तटीय सुरक्षा पोलिस यांना उपलब्ध करून दिले गेले आहे. यामुळे या पथकांचा शोध मोहिमा कमी कालावधीत पूर्ण होत आहेत. शोधमोहिमांसाठी लागणारा वेळ कमी करणे, जीव वाचविणे, लोकांना समुद्रात जखमी होण्यापासून वाचविणे तसेच संपत्तीचे नुकसान टाळणे व ती बरबाद होण्यापासून वाचविणे यासाठी नव्या अॅपचा उपयोग होणार आहे. ज्या जागी गतवेळी संबंधित वस्तू म्हणजे जहाज, माणसे अथवा अन्य वस्तू समुद्रात शेवटच्या पाहिल्या गेल्या त्याची माहिती दिली तर हे अॅप पुढील शोध घेते. चेन्नईतून उड्डाण केल्यानंतर गतवर्षी हरविलेल्या डॉर्निअर विमानाचा शोध अशा प्रकारचे लावण्यात यश आले आहे.

Leave a Comment