येणार फेरारीची एसयूव्ही


विश्वास ठेवणे अवघड वाटत असले तरी खात्रीलायक सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जगातील सुपर स्पोर्टस कार बनविणारी फेरारी एसयूव्हीवर काम करत आहे. फेरारीला या क्षेत्रात लाँबोर्गिनी, अॅस्टन मार्टिन अशा बड्या ब्रँडबरोबर स्पर्धा करावी लागणार आहे. या दोन्ही कंपन्यांनी त्यांच्या एसयूव्हीवर काम सुरू केल्याने फेरारीलाही एसयूव्ही डेव्हलप करणे स्पर्धेच्या दृष्टीने गरजेचे बनले आहे.

लोंबार्गिनीने उरूस या एसयूव्हीवर तर अॅस्टन मार्टिनने डीबीएकस क्रॅास ओव्हरवर काम सुरू केले आहे. फेरारीनेही त्यांच्या या सिक्रेट प्रोजेक्टवर काम सरू केले असून त्यांची एसयूव्ही २०२१ पर्यंत येईल असे समजते. तिला व्ही एट अथवा हायब्रिड पॉवर ट्रेनवर आधारित इंजिन दिले जाईल. तसेच नवी फेरारी एसयूव्ही नेक्स्ट जेन जीटीसी ४ ल्यूसोवर आधारीत व ऑल व्हील ड्राईव्ह फिचर्ससह येईल असेही सांगितले जात आहे.

Leave a Comment