दुबई पोलिसांची ही कार गर्दीतही ओळखणार संशयित


दुबई पोलिस विभागाचे अत्याधुनिकीकरण सुरू असून या वर्षअखेर त्यांच्या ताफ्यात अशी कार समाविष्ट होणार आहे जी अतिशय स्पेशल आहे. म्हणजे ही कार चालकरहित आहेच पण ती ड्रोन ने युक्त आहे. शिवाय सर्वात महत्त्वाचे म्हणजे गर्दीतही ही कार गुन्हेगार अथवा संशयितांचा वेध घेऊ शकणार आहे. ही कार प्रामुख्याने गस्तीसाठी वापरली जाणार आहे. मॉडेल ओआर ३ असे तिचे नांव आहे.

या कारमध्ये फेस रेक्गनिझेशन तंत्रज्ञानाचा वापर केला गेला आहे. त्यामुळे गर्दीतही ती गुन्हेगार अथवा संशयितांना ओळखू शकणार आहे. जेथे या कारला प्रवेश करता येणार नाही त्या भागात गस्त घालण्यासाठी कारसोबत असलेली ड्रोन वापरली जाणार आहेत. या कारमध्ये थर्मल इमेजिक तंत्रज्ञानही वापरले गेले आहे त्यामुळे अंधारातही ही कार पाहू शकते. ती लायसन्स प्लेट वाचू शकते. सिंगापूरच्या ओस्टाव डिजिटल कंपनीने ती तयार केली आहे. जगातील कार व ड्रोन एकत्र असणरे हे पहिलेच मॉडेल असल्याचा कंपनीचा दावा आहे.

ही कार अगदी छोटी आहे व तिचा वेगही कमी आहे. त्यामुळे गुन्हेगारांच्या पाठलागासाठी ती वापरता येणार नाही. वास्तविक ही कार म्हणजे एक प्रकारचा रोबो असून तो स्वयंचलित आहे. दुरवरून रिमोटच्या सहाय्यानेही त्याचे नियंत्रण करता येते.

Leave a Comment