कर्मचारी भविष्य निधीत पहिल्या सहामाहीत १ कोटी नवे सदस्य


केंद्रीय कामगार मंत्री बंगारू दत्तात्रय यांनी कर्मचारी भविष्य निर्वाह निधीत यंदा पहिल्या सहामाहीत म्हणजे १ जानेवारी ते ३० जून या काळात नवे १ कोटी सदस्य सामील झाले असल्याचे जाहीर केले आहे. त्याचबरोबर कर्मचारी राज्य विमा निगममध्येही याच काळात १ लाख २० हजार नवे सदस्य नोंद झाले आहेत.

दत्तात्रय म्हणाले स्वातंत्र्यानंतरच्या ६० वर्षात भविष्य निर्वाह निधीचे ४.३ कोटी कर्मचारी सद्स्य होते. तर राज्य विमा निगमच्या सदस्यांची संख्या १.९ कोटी होती. या दोन्हीमध्ये नवीन सदस्य नोदले जावेत यासाठी सरकारने शिस्तबद्ध रितीने प्रयत्न केले व देशव्यापी अभियान चालविले त्याला यश येताना दिसत आहे. या विभागाने जून ३० तारखेपर्यंत २४९८० कोटी रूपये एक्स्चेंज ट्रेडेड फंडात गुंतविले आहेत व त्यावर १२.५ टक्के परतावा मिळाला आहे. २०१७-१८ सालात २३ हजार कटींची गुंतवणक केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Leave a Comment