डॉ.गणपती स्वामींच्या नावाची गिनिज बुकमध्ये नोंद


मैसूर येथील ७५ वर्षीय डॉ.गणपती सच्चिदानंद स्वामी यांच्या नावाची गिनेज बुकमध्ये नोंद करण्यात आली असून जगातील सर्वाधिक चिमण्या पाळणारे म्हणून त्यांची ही नोंद केली गेली आहे. ते अवधूत पीतम या आश्रमाचे संस्थापक आहेत व आपले सारे आयुष्य त्यांनी चिमण्यांसाठी व्यतीत केले आहे. त्यांच्याकडे ४६८ जातींच्या विविध रंगांच्या २१०० चिमण्या आहेत व त्यांच्या देखभालीसाठी गणपतींनी २०१२ मध्ये सुकवाना पुनरूद्धार केंद्र उघडले आहे. जगभर फिरून ते विविध जातींच्या चिमण्या आणतात व त्यांचे पालन करतात. त्याचबरोबर आजारी, जखमी, चुकलेल्या चिमण्यांनाही आश्रमात आश्रय देतात त्यासाठी त्यांनी २१ एकर जागा दिली आहे.

या कामामागची प्रेरणा सांगताना ते म्हणाले सहा वर्षांपूर्वी ते व्हेनेझूएला येथील एंजल फॉल पाहण्यासाठी गेले होते त्यावेळी पाय घसरून ते १०० फूट खाली कोसळले व बेशुद्ध झाले. ते जेव्हा शुद्धीवर आले तेव्हा त्यांच्या अवतीभवती १०० हून अधिक चिमण्या बसल्याचे त्यांनी पाहिले व तेव्हाच त्यांनी चिमण्यांच्या रक्षणासाठी आयुष्य वाहून घेण्याचा निश्चय केला. त्यानंतर भारतात परतून त्यांनी या आश्रमाची स्थापना केली. येथे चिमण्यांसाठी तसेच प्राण्यांसाठी हॉस्पिटलही आहे. तेथेच डझनावारी बर्डरूम त्यांनी तयार केल्या आहेत. या आश्रमाचे डिझाईन सिंगापूरच्या जुरांग पार्कच्या धर्तीवर केले गेले असून डॉ.गणपती यांच्या मदतीला येथे ५० माणसे आहेत.

Leave a Comment