राष्ट्रसंघाच्या वारसा स्थळांच्या यादीत ‘फक्त पुरुषांसाठी’चे बेट


महिलांना प्रवेशबंदी असलेल्या एका बेटाचा समावेश संयुक्त राष्ट्रसंघाने नुकत्याच जाहीर केलेल्या वारसा स्थळांच्या करण्यात आहे. हे बेट जपानमध्ये आहे.

राष्ट्रसंघाची सांस्कृतिक संघटना असलेल्या युनेस्कोने दोन दिवसांपूर्वी वारसा स्थळांची यादी जाहीर केली. त्यात ओकिनोशिमा या बेटाचा समावेश आहे.

जपानमधील हे बेट अत्यंत प्राचीन धार्मिक स्थळ आहे. तेथे महिलांना जाण्यास मनाई आहे. नाविकांच्या सुरक्षेसाठी पूजल्या जाणाऱ्या ओकित्सु या पूजास्थळाचे हे स्थान मानण्यात येते. त्याची बांधणी 17व्या शतकात झाली होती. हे पूजास्थळ बांधण्यापूर्वी कोरिया व चीनला जाणाऱ्या जहाजांसाठी प्रार्थना व पूजा या बेटावर करण्यात येत असत, असे जपान टाईम्सने म्हटले आहे.

या बेटावर प्रवेश करण्यापूर्वी पुरुषांना कपडे काढावे लागतात आणि समुद्रात आंघोळ करून शुद्धीकरणाची प्रक्रिया पूर्ण करावी लागते. तेथून बाहेर पडताना त्यांना कोणतीही वस्तू आठवणीसाठी सोबत नेण्याची परवानगी नसते, किंवा त्यांच्या भेटीची माहिती कोणाला देत येत नाही.

या बेटावर दरवर्षी फक्त 27 मे या दिवशी पाहुण्यांना प्रवेश दिला जातो आणि प्राचीन नियमांचे तेथे अद्याप पालन केले जाते. त्यातही पाहुण्यांची संख्या 200 पर्यंत मर्यादित ठेवली जाते.

Leave a Comment