रेस्टॉरंटमध्ये चक्क रोबोट झाला वेटर


मुलतान – पाकिस्तानातील एका रेस्टॉरंटमध्ये एक रोबोटच वेटरचे काम करू लागला आहे. राबिया नावाचा एक रोबोट मुलतानमधील एका पिझ्झा रेस्टॉरंटमध्ये वेटरचे काम करत आहे. ओसामा जाफरी या अभियंत्याने तयार केलेल्या या रोबोटचे वजन २५ किलो आहे. एकावेळेस एक पिझ्झा हा रोबोट ग्राहकांपर्यंत नेऊ शकतो. साधारण मध्यम उंचीच्या या रोबोटने पांढरा-लाल रंगाचा अॅप्रन परिधान केला आहे. ओसामा जाफरी या वेटरच्या गळ्यात एक स्कार्फ ग्राहकांपैकी कोणा कट्टर व्यक्तीच्या भावना दुखावू नयेत म्हणून अडकवला आहे.

पिझ्झा डॉट कॉम नावाचे रेस्टॉंरंट ओसामाच्या वडिलांचे मुलतान शहरामध्ये असून हा रोबोट येथे काम करु लागल्यापासून मुलतानच्या लोकांनी येथे गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. पिझ्झाचा खप त्यामुळे दुपटीने वाढल्याचे ओसामा सांगतो. तीन नव्या रोबोटसह आता रेस्टॉरंटची नवी शाखा सुरु करण्याचा ओसामाचा विचार सुरु आहे.

Leave a Comment