पुढील वर्षीपासून ऑनलाईन वस्तूंवरही एमआरपी लागणार


ऑनलाईन विकल्या जाणाऱ्या वस्तूंवर ई-कॉमर्स कंपन्यांनी कमाल किरकोळ किंमत (एमआरपी) छापली पाहिजे, असा आदेश केंद्र सरकारने काढला आहे. ऑनलाईन ग्राहकांच्या हितांचे रक्षण करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. एमआरपीसोबतच मुदत संपण्याचा अवधी आणि कस्टमर केअरचे तपशील आदी माहिती देणेही अनिवार्य करण्यात आले आहे.

ग्राहक विषयांच्या मंत्रालयाने या संदर्भात वैधमापन (पॅकेटबंद वस्तू) नियम-2011 मध्ये सुधारणा केली आहे. कंपन्यांना या नवीन नियमांचे पालन करण्यासाठी सहा महिन्यांचा अवधी देण्यात आला आहे.

ऑफलाइन ग्राहकांना ज्या प्रमाणे संरक्षण देण्यात आले आहे, त्याच प्रमाणे ऑनलाईन ग्राहकांनाही ते मिळायला हवे. आतापर्यंत ऑनलाईन विकल्या जाणाऱ्या सामानावर एमआरपी छापण्यात येत होती. आता कंपन्यांना लेबलवर आणखी माहिती देण्यास सांगण्यात आले आहे, असे पीटीआय वृत्तसंस्थेने म्हटले आहे.

उत्पादनाची तारीख, मुदत संपण्याची तारीख, निव्वळ वजन, संबंधित उत्पादन कोणत्या देशातून आले आहे आणि कस्टमर केअरची माहिती आता कंपन्यांना द्यावी लागणार आहे. सोबतच कंपन्यांना ही माहिती मोठ्या अक्षरांमध्ये द्यावीव लागणार आहे, जेणेकरून ग्राहकांना ती वाचण्यास कष्ट पडूू नयेत.

ई-कॉमर्स प्लॅटफार्मवरून जे सामान विकले जात आहे, त्यावर जानेवारी 2018 पासून ही सर्व माहिती असणे आवश्यक असणार आहे. अन्यथा कंपन्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असे या मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्यांने सांगितले.

Leave a Comment