देशांतर्गत प्रवासात एअर इंडिया देणार फक्त ‘शाकाहारी जेवण’


नवी दिल्ली – आपल्या सोयीसुविधांमधून प्रवाशांना दिली जात असलेली आणखी एक सुविधा बंद करण्याचा निर्णय आर्थिक अडचणीत असलेल्या एअर इंडिया या कंपनीने घेतला आहे. एअर इंडियाच्या इकोनॉमी क्लासमधील प्रवाशांना दिले जाणारे ‘मांसाहारी जेवण’ आता न देण्याचा निर्णय एअर इंडियाने घेतला असल्यामुळे एअर इंडियाच्या विमानाच्या इकॉनमी क्लासमधून यापुढे देशांतर्गत प्रवास करणाऱ्या प्रवाशांना ‘मांसाहारी’ पदार्थ मिळणार नसल्याचे वृत्त द टाइम्स ऑफ इंडियाने दिले आहे.

एअर इंडियाच्या विमानाने लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाच मांसाहारी जेवण मिळणार आहे. आम्ही दोन आठवड्यांपूर्वीच इकोनॉमी क्लासमधून देशांतर्गत प्रवाशांना नॉनव्हेज जेवण न पुरविण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयामुळे आमची ७-८ करोड रूपयांची वार्षिक बचत होऊ शकते, अशी माहिती एअर इंडियाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. याबाबत एअर इंडियाचे प्रवक्ते जीपी राव म्हणाले की, मांसाहारी पदार्थ न पुरविण्याच्या निर्णयामुळे अन्नाची नासधूस कमी होइल, तसेच त्यासाठी होणारा खर्चही कमी होइल आणि प्रवाशांना देण्यात येणाऱ्या खानपानाची व्यवस्था सुधारेल.

Leave a Comment