पुतिन, ट्रम्प प्रतिमांसह नोकिया ३३१० सादर


रशियन फोन कस्टमायझर कंपनी कॅविअरने नोकियाचा नवा ३३१० फोन कस्टमाईज करून बाजारात आणला असून या फोनची किंमत आहे १ लाख ६०हजार रूपये. या फोनचे रिझाईन कंपनीने केले आहे. अर्थात अंतर्गत डिझाईन बदलले गेलेले नाही मात्र बाहेरचे रूपडे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व रशियाचे सर्वेसर्वा ब्लादीमीर पुतीन यांच्या प्रतिमांनी सजवले गेले आहे. या दोन नेत्यांमध्ये ब्रिक्स परिषदेत झालेल्या भेटीच्या थीमवर आधारित हा बदल केला गेला आहे.

या फोनच्या बॅकसाईडवर सोन्याची एक गोल्ड प्लेट ट्रम्प व पुतीन यांच्या प्रतिमांसह बसविली गेली आहे.फोनची बॉडी टिटॅनियम ब्लॅक वेलवेटपासून बनविली गेली असल्याने हा फोन मूळ फोनपेक्षा अधिक मजबूत व वजनदार झाला आहे.या फोनचे डिझाईन एचएमडी ग्लोबलने रिडिझाईन केले आहे. या फोनची मूळ किंमत आहे ३३१० रूपये. यात ड्यूल सिम, २ एमपीचा कॅमेरा, २२ तासाचा बॅटरी बॅकअप आहे मात्र इंटरनेट वायफाय सुविधा नाही.

Leave a Comment