ब्यूनस आयर्स- लोकप्रिय डेटिंग सिटी


स्पेनपासून स्वतंत्र झालेल्या अर्जेंटिनाचा स्वातंत्र्यदिवस ९ जुलैला साजरा केला जातो. स्वातंत्र्यानंतर या देशाने सर्वच आघाड्यावर प्रगती केली आहे. येथील ब्यूनस आयर्स हे शहर जगभरात डेटिंगसाठी अतिशय उत्तम शहर म्हणून वाखाणले जाते. येथील रेस्टॉरंटस, पबस, पार्कमधून मुले मुली भेटतात, दोस्ती होते व नंतर ते एकत्र येतात. अर्जेटिना आकाराच्या बाबतीत जगातील आठ नंबरचा मोठा देश आहे मात्र याची लोकसंख्या आहे केवळ ४ कोटी ४२ लाख. ही आकडेवारी २०१५ ची आहे.

ब्यूनस आयर्स या रोमँटिक शहरात पार्कस भरपूर आहेत त्याचबरोबर येथे रेड वाईनची मजा चाखण्यासाठीही मोठ्या संख्येने युवकयुवती येतात. येथे त्यांच्यासाठी रोमँटिक बार आहेत, नाईट क्लब आहेत. जगभरात मस्त म्हणून ओळखला जाणारा टँगो डान्सचा जन्म इथलाच. येथील नाईट लाइफ सकाळी १० वाजले तरी संपतच नाही अशीही या शहराची ख्याती आहे.


विशेष म्हणजे या देशात वेश्याव्यवसाय कायदेशीर आहे. मात्र या व्यवसायाला प्रोत्साहन देणे, पैशांसाठी हा व्यवसाय करणे अथवा शोषण करणे हा मात्र कायदेशीर गुन्हा ठरतो. जगात सर्वाधिक दारू बनविणार्‍या देशांत या देशाचा नंबर लागतो. येथे दारूचे १८०० कारखाने आहेत. तसेच माणसांची ओळख पटविण्यासाठी फिंगरप्रिंटचा वापर करण्याची सुरवात याच देशात झाली असेही सांगितले जाते.अर्जेटिना या लॅटिन शब्दाचा अर्थ आहे चांदी.

Leave a Comment