डुकातीच्या कोटीमोलाच्या बाईकचे ओबेराय मालक


जगातल्या महागड्या व देखण्या बाईक बनविणार्‍या दुकातीच्या सुपरबाईक १२९९ सुपरलेगेराचे लॉचिंग दणक्यात झाले असून या बाईकची किंमत आहे १ कोटी १२ लाख रूपये. कंपनीचे अशा केवळ ५०० बाईकस तयार करण्यात येणार असल्याचे पूर्वीच जाहीर केले आहे व या सर्व बाईक्ससाठी बुकींग फुल्ल झाल्याचेही सांगितले जात आहे.

दुकातीच्या या ५०० सुपरबाईकपैकी २०९ नंबरची बाईक ओबेराय ग्रुप ऑफ हॉटेल्सचे एक मालक विक्रम ओबेराय यांनी खरेदी केली आहे. या बाईकसाठी १२८५ सीसीचे इलेक्ट्रीक कूल इंजिन सहा स्पीड गिअरबॉक्ससह दिले गेले आहे. बाईकसाठी कार्बन मोनोकॉल फ्रेम, सिंगल सायडेड स्विनग्रॅम, रियर सबफ्रेम, फेयरिंग अॅल्युनिनियम हब्ससह कार्बन फायबर व्हिल्स दिली गेलीआहेत. बाईकचे वजन आहे १५६ किलो. व इंधन टाकीची क्षमता आहे १७ लिटर

Leave a Comment