सरकारी अॅप दूर करणार जीएसटी बद्दलच्या शंका-कुशंका


मुंबई – सध्या सोशल मीडियावर कुठल्या वस्तू व सेवांवर किती जीएसटी आहे याबद्दल उलटसुलट मेसेज फिरत असून सेंट्रल बोर्ड ऑफ एक्साइज अँड कस्टमने या सगळ्यावर मार्ग काढण्यासाठी मोबाइल अॅप लाँच केले आहे.

वापरण्यास हे अॅप अत्यंत सुलभ असून वस्तू आणि सेवांच्या कॅटेगरीमध्ये संपूर्ण यादी बघता येईल व कर व अन्य माहिती मिळवता येईल असे सीबीएसईने म्हटले आहे. तसेच जीएसटी म्हणजे काय, त्याचा प्रवास कसा होता, ड्राफ्ट काय आहे, तरतुदी काय आहेत अशा सगळ्या बाबीदेखील अॅपच्या माध्यमातून पोचवण्यात येत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. एका पाहणीमध्ये जवळपास ५० टक्क्यांपेक्षा जास्त लोकांमध्ये जीएसटीसंदर्भात जागरूकता नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे सगळ्या लोकांपर्यंत पोचण्यासाठी हा अॅपचा मार्ग अवलंबण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

Leave a Comment