आनंद महिंद्रांनी मागितली कर्मचाऱ्यांची जाहीर माफी


नवी दिल्ली – टेक महिंद्राच्या एचआर आणि एका कर्मचाऱ्याच्या दूरध्वनी संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. संबंधित कर्मचाऱ्याला कंपनीने काढण्यासाठी वापरलेल्या पद्धतीचा समस्त कर्मचारी वर्गाने विरोध केला होता. त्याच संदर्भात महिंद्र अॅन्ड महिंद्रा समूहाचे चेअरमन आनंद महिंद्रा आणि टेक महिंद्राचे सीईओ सी.पी. गुरनानी यांनी शनिवारी जाहीर माफी मागितली आहे.

सोशल मीडियावर समूहाचे चेअरमन महिंद्र म्हणाले, की कर्मचाऱ्यांच्या सन्मानाचे रक्षण करणे हे कंपनीच्या मूलभूत तत्वांपैकी एक आहे. या घटनेबद्दल मी वैयक्तिकरीत्या माफी मागतो. प्रत्येकाच्या सन्मानाचे रक्षण करणे हे आमच्या मूलभूत तत्वांपैकी एक आहे. पुढे असा कोणताही प्रकार होणार नाही, याची आम्ही काळजी घेणार आहोत. कर्मचाऱ्याला कंपनीच्या व्हाईस चेअरमनने सुद्धा दिलेला व्यवहार योग्य नव्हता असे मान्य केले आहे.

Leave a Comment