मलालाच्या पहिल्या ट्विटनंतर १ लाख फॉलोअर्स अर्ध्या तासात वाढले


पहिल्यांदाच ट्विटरवर ‘हाय ट्विटर’ असे म्हटल्यानंतर नोबेल विजेत्या मलाला युसुफजईचे एक लाख फॉलोअर्स अवघ्या अर्ध्या तासातच वाढले आहेत. या ट्विटनंतर लगेचच मलालाने दुसरा ट्विट टाकले, माझा आज शाळेतील शेवटचा दिवस होता आणि ट्विटवरचा पहिला दिवस, असा संदेश त्यात लिहीला. अनेकदा हे ट्विटही रिट्विट झाले. मलालाने खरेतर २०१२ मध्येच ट्विटर अकाऊंट सुरू केले होते, पण त्यावर कोणताही ट्विट पोस्ट केला नव्हता.

तिने शुक्रवारी पोस्ट टाकताच तिचे फॉलोअर्स एक लाखाने वाढले आहेत. तिचे अनेक नेटिझन्सनी स्वागत करत तिला अनेक रोचक सल्लेही दिले आहेत. मलाला युसुफजईने याआधी आपली संघटना मजबूत करण्यासाठी ट्विटर पेजचाच उपयोग केला आहे. पण तिने आजवर स्वतःचे ट्विटर हँडल वापरले नव्हते. आता सोशल साईटसोबत मलालाने पहिल्यांदाच स्वतःला जोडल्यामुळे तिचे फॉलोअर्स थोड्याच वेळात वाढले आहेत.

Leave a Comment