७५ वर्षींच्या कलारीपयटटू तज्ञ मीनाक्षी अम्मा


वय हे आपल्या कतृत्त्वाआड कधीच येऊ शकत नाही याचा परिचय केरळ मधील मीनाक्षी अम्मा करून देत आहेत. ७५ व्या वर्षात पदार्पण करत असलेल्या मीनाक्षी अम्मा भारतातील सर्वात वयोवृद्ध कलारीपंयटटू महिला आहेत. कलारीपयटटूची परंपरा कायम राखताना त्या आजही काठी, तलवार, भाला घेऊन मैदानान उभ्या आहेत. केरळच्या वाटकरा गावच्या रहिवासी अम्मा या कलेतील आहेत व गेली साठ वर्षे ही कला जोपासत आहेत तसेच त्याच्या प्रशिक्षण केंद्रात १५० युवकांना या कलेचे शिक्षण देत आहेत.

कलारीपटटयू ही जुनी युद्धकला आहे. त्यातील कलारी म्हणजे स्कूल किंवा व्यायामशाळा व पयटटू म्हणजे युद्ध अथवा व्यायामासाठी घेण्याची कठोर मेहनत. विष्णुचा अवतार परशुरामाने ही कला सुरू केली असे मानले जाते. यात शरीराबरोबर मनही बलवान होते व त्याचा मुख्य हेतू आत्मरक्षण हाच आहे. ही एक प्रकारची मार्शल आर्ट आहे व भारतात केरळ, तमीळनाडू, कर्नाटक राज्यांबरोबरच श्रीलंका, मलेशिया या देशांतही ती प्रचलित आहे.

मीनाक्षीअम्मांचे यजमान राघव मास्टर हेही या कलेतील तज्ञ. ते आता हयात नाहीत. मात्र मीनाक्षीअम्नांनी ही कला आजही जिवंत ठेवली आहे. त्यांचे अनेक शिष्य आता प्रशिक्षक बनले आहेत. मीनाक्षीअम्मा वयाच्या ७५ तही तरूणांना लाजवेल इतक्या चपळाईने युद्दाचे हात करून दाखवितात.

Leave a Comment