शरीराचा आकार वाढेल त्या प्रमाणात वाढणारे कपडे


आजकालची दुनिया स्मार्ट दुनिया आहे. म्हणजे स्मार्टफोन, स्मार्ट वॉच, स्मार्ट की, स्मार्ट कार, स्मार्ट शूज, स्मार्ट होम अशी ही मारूतीच्या शेपटीप्रमाणे प्रचंड मोठी यादी आहे. त्यात आता स्मार्ट कपड्यांचीही भर पडते आहे. पॅरिस येथे सुरू असलेल्या फॅशन शो मध्ये जपानचा प्रसिद्ध डिझायनर युईमा नकाझोटो याने कपड्यांसाठी डिजिटल तंत्रज्ञान विकसित केल्याचा दावा केला आहे. हे तंत्रज्ञान डिझाईन विश्वात क्रांती आणेल असे त्याचे म्हणणे आहे.

युईनाच्या म्हणण्यानुसार त्यांनी लोकांना एकदम फिट बसतील असे कपडे तयार केले आहेत. ३१ वर्षीय युईना गेले सहा महिने नायलॉन, वूल, कॉटन यांच्यावर थ्रीडी तंत्रज्ञानाचे प्रयोग करतो आहे. त्याच्या म्हणण्यानुसार आता ग्राहकांना त्याचा साईज बदलला तरी कपडे बदलावे लागणार नाहीत. म्हणजे एखाद्याचे वजन वाढून साईज वाढला, तरी त्याला पूर्वीचेच कपडे एकदम फिट बसतील. म्हणजे माणसाच्या आकाराप्रमाणे कपडेही त्यांच्यात बदल करतील. त्यासाठी त्याने डिजिटल कटिंगचे तंत्र विकसित केले आहे.

यात प्रथम ज्याला कपडे घालयाचे आहेत त्याचे प्रथम स्कॅनिंग केले जाते. त्या हिशोबाने डिजिटल तंत्राने कापलेले कपडे सेट करून त्यातून मस्त ड्रेस तयार केले जातात. हे कपडे स्वतःच ग्राहकाच्या आकारानुसार अॅडजस्ट होतात. सध्या हे कपडे अतिश्रीमंतांनाच परवडू शकतील अशा किंमतीत आहेत मात्र लवकरच ते मध्यम तसेच कनिष्ठ वर्गीयांसाठीही बनतील असे युईनाचे म्हणणे आहे.

Leave a Comment