पोट्रेट नावाची अनोखी इमारत


ऑस्ट्रेलियातील मेलबर्न शहरात ख्राईस्टचर्च रोडवर असलेली एक इमारत आवर्जून पहायला हवी अशी बांधली गेली आहे. या इमारतीचे नांवच मुळी पोट्रेट असे असून या ३२ मजली इमारतीकडे पाहताना त्यावर एक भव्य चेहरा सहज दिसून येतो. त्यामुळे एकदा या इमारतीकडे पाहिले की पाहणारा अचंबित होऊन पुन्हा एकदा निरखून पाहतोच असे निरीक्षण नोंदविले गेले आहे. हा कोणताही चमत्कार नाही तर वास्तूरचनाकारांनी कौशल्याने साधलेली ती किमया आहे.

या इमारतीवर दिसणारा चेहरा विलीयम बराक यांचा आहे. ऑस्ट्रेलियात काळा गोर्‍यातील भेद कमी होण्यासाठी यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले होते. त्यांना सन्मान देण्यासाठी या ३२ मजली इमारतीचे डिझाईन अशा प्रकारे केले आहे की त्यावर ८५ मीटर उंचीचा हा चेहरा स्पष्ट पाहता येतो. इमारतीच्या पांढर्‍या भितींवर काळ्या खिडक्या अशा प्रकारे बसविल्या गेल्या आहेत की त्यातून बराक यांच्या चेहर्‍याचे थ्रीडी मॉडेल तयार झाले आहे. साधारण तीन किमी अंतरावरूनही हा चेहरा स्पष्टपणे दिसतो. ही इमारत उभारण्यास सात वर्षे लागली असून ५ मार्च २०१५ ला ती पूर्ण केली गेली आहे.

Leave a Comment