स्वस्त झाले दिल्लीला येणे-जाणे


नवी दिल्ली – एव्हिएशन रेग्यूलेटरी बॉडीने विमान प्रवासावर लागणाऱ्या यूजर्स डेव्हलपमेंट फिसमध्ये (यूडीएफ) कपात केल्यामुळे विमानाने दिल्लीला येणे-जाणे स्वस्त झाले आहे. ही कपात डोमेस्टिक आणि आंतरराष्ट्रीय अशा दोन्ही विमान तिकीटांवर करण्यात आली आहे. शनिवारी बदललेले दरपत्रक नागरी हवाई वाहतूक संचालक जारी करणार आहेत. या फीसमधून दिल्ली विमानतळाला वार्षिक ३५० कोटींचा फायदा होत होता.

यूजर डेव्हलपमेंट फीस (यूडीएफ) भारतीय विमानतळांवर एअरक्राफ्ट रुल्स-१९३७च्या नियम-८९ नुसार आकारली जाते. एअरपोर्ट ऑपरेटर्सला यामुळे त्यांच्या उत्पन्नात अचानक घट झाला तर तो दूर करण्यास मदत होते. यातून त्यांच्या गुंतवणूकीची भरपाई केली जाते. वेगवेगळ्या विमानतळांच्या अंतरावर यूडीएफ निश्चित केली जाते. मोठ्या विमानतळावर ही शुल्क निश्चिती एअरपोर्ट्स इकॉनॉमिक रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया (एआयआरए) निश्चित करतात. तर, छोट्या विमानतळांवरील यूडीएफ निश्चितीचा अधिकार नागरी उड्डायण मंत्रालयाला आहे.

यूडीएफमध्ये कपात करण्याचे आदेश एअरपोर्ट इकॉनॉमिक रेग्युलेटरी अथॉरिटीने डिसेंबर २०१५ मध्ये दिले होते. मात्र दिल्ली विमानतळाच्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाने त्यावर स्थगिती दिली होती. तेव्हापासून ही कपात अडगळीत पडली होती. त्याला एअर इंडियाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्यावर ३ जुलै रोजी झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली उच्च न्यायालयाचा स्थगिती आदेश रद्द केला. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर दिल्लीतून उड्डाण करणाऱ्या फ्लाइट्सवरील यूडीएफमध्ये कपात करण्यात येणार आहे. त्यासोबत लँड होणाऱ्या फ्लाइट्सवर यूडीएफ लागणार नाही.

Leave a Comment