देशाच्या परकीय चलन गंगाजळीत पुन्हा एकदा वाढ झाली असून ही गंगाजळी ३८६.५३९ अब्ज डॉलर्सवर गेली आहे. ३० जून रोजी संपलेल्या सप्ताहात या गंगाजळीत उच्च पातळीवर म्हणजे ४.००७ अब्जानी वाढ झाली आहे.
देशाच्या परकीय गंगाजळीत विक्रमी वाढ
या संदर्भात रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या माहितीनुसार ही वाढ फॉरिन करन्सी अ्रॅसेट वाढल्यामुळे झाली आहे. गत आठवड्यात फॉरेक्स रिझर्व्ह ५७६.४ दशलक्ष डॉलर्सने वाढून ३८६.५३ अब्जांवर पोहोचला. सोन्याच्या साठ्यातही वाढ झाली असून तो २५२.८ दशलक्ष अमेरिकी डॉलर्सवर पोहोचल्याचे जाहीर करण्यात आले आहे.