सप्टेंबरपर्यंत रेल्वेच्या ऑनलाईन तिकीटांवर सर्व्हिस चार्ज नाही


नवी दिल्ली – आता सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन रेल्वे तिकीट बुकिंगवरील सर्व्हिस चार्जची सूट वाढविली असून सर्व्हिस चार्ज जीएसटी लागू झाल्यानंतर कालबाह्य झाला आहे. पंरतु आयआरसीटीसीच्या माध्यमातून तिकीट बुकींग केल्यानंतर आपल्या सर्व्हिस चार्ज द्यावा लागत होता.

रेल्वे तिकीट आयआरसीटीसीच्या माध्यमातून ऑनलाईन बुकींग केल्यानंतर २० ते ४० रुपयांपर्यंत प्रति तिकीट सर्व्हिस चार्ज द्यावा लागत होता. त्यामुळे प्रवाशांची ४० रुपयांपर्यंत बचत होणार आहे. आयआरसीटीसीचे या निर्णयामुळे ५०० कोटींचे नुकसान होण्याचा अंदाज आहे. रेल्वे प्रवाशांना ऑनलाईन तिकीटांवर सर्व्हिस चार्जपासून सप्टेंबरपर्यंत सवलत मिळाली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार रेल्वे मंत्रालयाने अर्थ मंत्रालयाकडे ५०० कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईची मागणी केली आहे.

सरकारने नोटबंदीनंतर डिजिटल ट्रान्झेक्शनला प्रोत्साहन देण्यासाठी नोव्हेंबर २०१६ ते मार्च २०१७ पर्यंत सर्व्हिस चार्ज हटवला होता. त्यानंतर ही सवलत ३० जून २०१७ पर्यंत वाढविली गेली आणि सरकारने नवीन निर्णयानुसार रेल्वे प्रवाशांना सप्टेंबरपर्यंत सूट दिली आहे. रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, सरकारने प्रवाशांच्या सुविधेसाठी व डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी ही सवलत कायम करण्याचा निर्णय घेतला आहे.

Leave a Comment