नवी दिल्ली – नव्याने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वांमध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने म्हटले आहे की, ३ दिवसांच्या आत बँक ग्राहकाने ऑनलाइन अनधिकृत इलेक्ट्रॉनिक बँक व्यवहाराने झालेल्या नुकसानीची माहिती दिल्यास त्यांना कोणतीही झळ बसणार नाही. असे केल्याने १० दिवसांच्या आत संबंधितांच्या अकाउंटमध्ये पूर्ण रक्कम परत करण्यात येईल. दुसरीकडे, थर्ड पार्टी फ्रॉडची सूचना देण्यात जर ४ ते ७ दिवसांचा उशीर झाला, तर ग्राहकाला २५ हजार रुपयांपर्यंत नुकसान सोसावे लागेल. यामुळे वेळेवर फसवणुकीची माहिती बँकेला देणे गरजेचे झाले आहे.
ऑनलाइन फसवणुकीचे पैसे मिळणार परत
आरबीआयने सांगितले की, थर्ड पार्टी फसवणुकीच्या प्रकरणात कस्टमरची झीरो लायबिलिटी असेल, एखादी चूक ना बँकेची असेल ना कस्टमरची, मात्र असे सिस्टिममुळे झाले असेल. तथापि, ग्राहकाला बँकेकडून अनधिकृत व्यवहाराची माहिती झाल्यास याची माहिती कार्यालयीन कामकाजाच्या तीन दिवसांच्या आत बँकेला कळवावी लागेल.