सोशल मीडियाचा ७ वर्षांचा ‘बॉडी बिल्डर’


सध्या सोशल मीडियावर चीनमधील एका ७ वर्षाच्या मुलाचा फोटो जोमाने व्हायरल होत आहे. या मुलाचा फोटो सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. या ७ वर्षांच्या मुलाने चक्क ८ पॅक अॅब्ज कमावले असून त्याचे अनेक फोटो सोशल मीडियावरही व्हायरल होत आहेत.

अनेकांसाठी जगासमोर फिटनेसचा जणू आदर्शच ठेवणारा हा मुलगा स्फूर्तीस्थान ठरण्याची शक्यता आहे. त्याने ७ वर्षांचा असताना आपली बॉडी बनवली आहे, त्याला यापुढेही असाच फिटनेस ठेवायचा असून त्याने पुढील अनेक वर्षांचेही नियोजन केले आहे. चीनमधील हॅंगझोऊ येथे राहणाऱ्या या मुलाचे नाव चेन ई असे असून एका स्थानिक स्पर्धेत सहभागी झालेल्या चेनचे फोटो नुकतेच व्हायरल झाले आहेत. याठिकाणी झालेल्या जिमनॅस्टीकच्या स्पर्धांमध्ये त्याला आतापर्यंत ६ सुवर्ण तर १ रौप्य पदक मिळाले आहे. त्याच्या फोटोंवर आतापर्यंत ३० हजार प्रतिक्रिया आलेल्या असून त्याला ७०० हून अधिक शेअर मिळाले आहेत.