येतेय टाटांची कॉम्पॅक्ट एसयूव्ही नेक्सॉन


भारतातील बडी कंपनी टाटा मोटर्सच्या टियागोला चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर आता कंपनी त्यांची नवी कार ग्राहकांसमोर पेश करण्याच्या तयारीत आहे. भारतातील पहिली सबकॉम्पॅक्ट एसयूव्ही नेक्सॉन कंपनी लवकरच बाजारात उतरवत आहे. ही गाडी ऑगस्ट अखेरी अथवा सणांच्या सीझनमध्ये बाजारात येईल असे समजते. ही गाडी पेट्रोल व डिझेल अशा दोन्ही व्हेरिएंटमध्ये येत आहे.

पेट्रोल व्हर्जनसाठी १.२लिटरचे टर्बोचार्ज ३ सिलेंडर इंजिन व पाच स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स दिला जात आहे तर डिझेलसाठी १.५ लिटरचे चार सिलींडर इंजिन ६ स्पीड मॅन्युअल व ऑटो ट्रान्समिशन ऑप्शनसह दिले जाणार आहे. नव्या प्रकारचे ग्रील, डे टाईम रनिंग लँप्स, स्टायलिश प्रोजेक्टर हेडलँपस, रियर क्रोम अॅक्सेंट एलईडी टेललँप, कि लेस, पुश स्टार्ट बटण, रिव्हर्स पार्किंग कॅमेरा, ६.५ इंची इन्फोटेनमेंट सिस्टीम, अँटी ब्रेकींग लॉक सिस्टीम, कॉर्नर स्टॅबिलिटी कंट्रोल अशी त्याची अन्य फिचर्स आहेत.

Leave a Comment