समुद्रपाणी शुद्ध करणार्‍या जीपमधून मोदींचा फेरफटका


इस्त्रालय दौरयातील शेवटच्या तिसर्‍या दिवशी पंतप्रधान मोदी यांना इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजमिन नेतन्याहू यांनी इस्त्रालयने विकसित केलेल्या आणखी एका तंत्रज्ञानाचा नुमना पेश केला. हायफा शहरात नेतन्याहू यांनी मोदींना ओल्गा बीचवर खारे पाणी त्वरीत पिण्यालायक बनविणार्‍या चालत्याफिरत्या जीपमधून चक्कर मारून आणली. मोदींनीही या तंत्रज्ञानाविषयी सर्व माहिती जाणून घेतली.

१५४० किलो वजनाच्या या जीपवर नदी, तलाव, समुद्र, विहीरी अशा कोणत्याही ठिकाणचे पाणी त्वरीत शुद्ध करून पिण्यालायक बनविण्याची सामग्री बसविली गेली आहे. ही जीप ताशी ९० किमी वेगाने जाऊ शकते व एका दिवसांत समुद्राचे २० हजार लिटर पाणी पिण्यालायक बनवू शकते. ही जीप विहीरी, नदी, सरोवरे यांनाही कनेक्ट करता येते. दूषित पाणीही स्वच्छ करून ते जागतिक आरेाग्य संघटनेच्या मानकांनुसार पिण्यालायक बनविण्याची या जीपची क्षमता आहे. या जीप राईडमध्ये मोदींनी पाणी स्वच्छतेचे प्रात्यक्षिक पाहिलेच पण त्यांनी व त्यांच्याबरोबरीच्या अधिकार्‍यांनी या पाण्याची चवही घेतली.

Leave a Comment