जीएसटीमुळे स्वस्त झाल्या रेनॉल्टच्या गाड्या


मुंबई : टाटा, होंडा यांसारख्या अनेक कंपन्यांनी जीएसटी लागू झाल्यानंतर आपल्या गाड्यांच्या किंमतींमध्ये कपात केली आहे. फ्रेंच कार कंपनी ‘रेनॉल्ट’नेही आपल्या गाड्यांच्या किंमतीत ७ टक्क्यांनी घट केली असल्याने ग्राहकांना आता रेनॉल्टच्या गाड्या ५ हजार २०० ते १ लाख ४ हजार रुपयांपर्यंत सवलतीत मिळतील.

रेनॉल्टने क्वीड क्लायम्बर एएमटीमध्ये ५२०० ते २९५०० रु, एसयूव्ही डस्टर RXZ AWDमध्ये ३०४०० ते १,०४,७०० रु तर लॉजी स्टेपवे RXZमध्ये २५,७०० ते ८८,६०० रुपयांपर्यंत कपात केली आहे. आम्ही जीएसटी करप्रणालीचा फायदा ग्राहकांना देण्याचे ठरवले आहे, अशी प्रतिक्रिया रेनॉल्ट इंडियाचे व्यवस्थापकीय संचलक सुमान सावनी यांन सांगितले.

Leave a Comment