भारतात लॉन्च झाली मर्सिडीजची नवी कोरी जीएलए कार


नवी दिल्ली: भारतात मर्सिडीज बेंजच्या कलेक्शनमधील सर्वात छोटी एसयूव्ही मानली जाणारी अपडेटेड जीएलए कार लॉन्च करण्यात आली आहे. ३२.३० लाख रूपये ऐवढी या कारच्या पेट्रोल मॉडेलची किंमत आहे. तर डिझेलमध्ये या कारचे तीन मॉडेल आहेत. त्यातील जीएलए २००डी स्टाईलची किंमत ३०.६५ लाख, जीएलए २००डी स्पोर्टस कारची किंमत ३३.८५ लाख तर जीएलए २२०डी 4MATIC कारची किंमत ३६.७५ लाख ऐवढी आहे. आधी या एसयूव्ही ची किंमत ३३.१ ते ३६.२ लाख रूपये दरम्यान होती.

नवीन फ्रन्ट, रिअर बंपर ‘बेबी बेंज’मध्ये देण्यात आले आहे, या कारला जे एसयूव्ही सारखा लूक देते. ऑल एलईडी हेडलॅम्प, टेल लॅम्प सेटअप, १८ इंच अलॉय व्हिल्ससारखे फिचर्स अपडेट करण्यात आले आहेत. सोबतच यावेळी या कारला ४८१ लीटरचा बूट स्पेस देण्यात आला आहे. जीएलएमध्ये २.० लीटर पेट्रोल, २.१ लीटर डिझेल इंजिन देण्यात आले आहे. जीएलए २०० आणि जीएलए २०० डी १८४ पीएस/३०० एनएम आणि पीस/३०० एनएमची पावर देते. तेच याचे फोर व्हिल ड्राईव्ह व्हर्जन १७० पीएसची पावर आणि ३५० एनएमचा टार्क निर्माण करते. दोन्ही इंजिन ७ स्पीड ड्यूल क्लच गिअरबॉक्सला कनेक्ट आहेत.

Leave a Comment