गुगलवर ‘हा’ शब्द सर्च केला तर चारचौघात होईल पंचाईत!


मुंबई – ‘गुगल बाबा’वर एखाद्या विषयाची, वस्तूंची, व्यक्तींची माहिती हवी असल्यास सर्च ऑप्शनमध्ये संबंधित ‘की-वर्ड’ टाकला की काही सेकंदातच तुम्हाला हवी असलेली माहिती उपलब्ध होते. अगदी फोटो, व्हिडिओ, त्यासंदर्भातील बातम्यांपासून सगळीच माहिती एका क्लिकवर मिळते. पण कधी-कधी गुगलवर एखादा की-वर्ड टाकला की एखादी भलतीच माहिती समोर येते.

गुगलच्या इमेज संदर्भात सर्च ऑप्शनमध्ये ‘south indian masala’ हा शब्द टाकल्यानंतर आलेला रिझल्ट पाहून सर्वांनाच धक्का बसतो आहे. एका यूजर्सने दक्षिणात्य मसाल्यांची माहिती मिळवण्यासाठी हा शब्द सर्च बॉक्समध्ये टाकला तर दाक्षिणात्य अभिनेत्रींचे ‘ते’ फोटो समोर येतात. पण हेच जर कोणी ‘north indian masala’ हा की-वर्ड टाकून माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला तर वेगवेगळ्या प्रकारच्या मसाल्यांचे फोटो पाहायला मिळतात. गूगलच्या सर्च इंजिनमध्ये अशा प्रकारचा रिझल्ट दाखवण्याचे एक कारण आहे. गुगलला मूळात ‘मसाला’ हा शब्द माहिती नाही.

गुगलला मसाला शब्द टाकल्यावर भारतीय मसाल्यांचे जिन्नस किंवा त्यांच्या प्रकारांबद्दल माहिती द्यावी हे समजत नाही. तेव्हा ज्या-ज्या गोष्टींसाठी ‘मसाला’ हा शब्द वापरला जाईल, त्या संदर्भातील ‘ए टू झेड’ माहिती गुगल आपल्या रिझल्टमध्ये दाखवतो. आता दाक्षिणेकडे तिथल्या अभिनेत्रींबद्दल माहिती देताना ‘south indian masala’ हा शब्द वापरला गेला असेल किंवा या शब्दाचा अत्यंत चुकीच्या पद्धतीने वापर केला असेल म्हणून असा रिझल्ट गुगलकडून दाखवण्यात येत असल्याची शक्यता नाकारता येत नाही.

Leave a Comment