येागींची आता मेक इन यूपी योजना


केंद्राच्या मेक इन इंडियाला मिळालेले अभूतपूर्व यश लक्षात घेऊन यूपीचे मुख्यमंत्री अदित्यनाथ योगी यांनी याच धर्तीवर मेक इन यूपी विभाग स्थापन करण्याचा निर्णय घेतला असून त्याला मंत्रीमंडळाने मान्यता दिली आहे. यासाठी उत्तरप्रदेश औद्योगिक गुंतवणूक व रोजगार प्रोत्साहन निती २०१७ तयार करण्यात आली आहे.

या नितीनुसार राज्यातील कांही क्षेत्र गुंतवणूक व उत्पादन प्रकल्पासाठी निश्चित करण्यात येत आहे. मेक इन इंडिया योजनेप्रमाणेच यातही कौशल्य विकास, बौद्धिक संपदा संरक्षण करतानाच जगाचे लक्ष राज्याकडे वेधून घेण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. यासाठी गुंतवणूकदारांना तसेच उत्पादकांना उत्तम उत्पादन सुविधा पुरविल्या जाणार आहेत यामुळे रोजगार निर्मितीस चालना मिळणार आहे. व परिणामी राज्याच्या आर्थिक विकासास बळ मिळणार आहे. राज्यात वाणिज्य व्यवहार सुरक्षेसंदर्भात कानपूर, नॉएडा, गोरखपूर, बुंदेलखंड व पूर्वांचल येथे औद्योगिक क्लस्टरसाठी विशेष पोलिस दल तैनात केले जाणार आहे. वायु, जल, सडक जाळे विस्तारले जाणार असून यामुळे उत्पादित वस्तूंची नेआण सहज होऊ शकणार आहे. त्यासाठी मेट्रो सेवा वाढविणे तसेच राज्याचे महामार्ग रूंदीकरण केले जात आहे.

Leave a Comment