चिनी देवांचा विमानातून बिझीनेस क्लासमधून प्रवास


चिनी देवांच्या तीन प्रतिमा विमानाच्या बिझिनेस क्लासमधून मलेशियाला रवाना करण्यात आल्याचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाले असून यात देवांच्या मंदिरातून निघण्यापासून ते शिआमेन गाओकी विमानतळावर चेक इन करण्यापर्यंत हे फोटो आहेत. या देवांसाठी ९३१ डॉलर्स खर्च करून बिझिनेस क्लासची विमानाची तिकीटे खरेदी केली गेल्याचे समजते.

मिळालेल्या माहितीनुसार मलेशिया व चीनमध्ये सांस्कृतिक आदानप्रदान कार्यक्रमाचे आयोजन केले असून हा कार्यक्रम मलेशियात होत आहे. त्यासाठी चीनची समुद्र देवता माजू याची १.८ मीटरची उंच प्रतिमा अन्य दोन देवतांसह पाठविल्या गेल्या आहत. माजू सोबत किआनलिआन म्हणजे शुनफेंगर या मच्छीमार व नाविक संरक्षक देवतेची व अन्य एका देवाची प्रतिमा पाठविली गेली आहे. मलेशियात समुद्र देवतेचे आभार मानण्यासंदर्भातला एक कार्यक्रम केला जाणार आहे. या प्रतिमांसोबत १३० भाविकही रवाना झाले आहेत. फुआन प्रांतात या देवतांची मंदिरे असून हे स्थान या देवतांचे जन्मस्थळ मानले जाते.

Leave a Comment